नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र लोकसभा निवडणुकीतला पराभव मराठा समाजामुळेच झाला आता असं स्पष्ट होत आहे पंकजा मुड्डे यांनी थेट विरोधात जाऊन बीडचा राजकीय आवाका संकुचित केला. गुलामगिरीतील गॅजेट मान्य कसं झालं? मंडळ आयोगाने जसं आरक्षणाचे गॅझेट दिलं तसंच ते तुम्ही खाल्लत का? आणि त्यावरून पंकजा मुंडे विरुद्ध मनोज जरांगे उभे ठाकले. चुकीच्या वेळी पंकजा बोलल्या आणि जरंगेना मुद्दा मिळाला. बीडमध्ये दोन दसरे होतात. एक भगवान गडावर आणि दुसरा नारायण गडावर. ताकद कोणाची जास्त आहे नेमकं गंडलं कोणाचा आहे हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. तुम्ही
जर मनोज चरांगे यांचे कट्टर समर्थक असाल तर हा क्षण तुमची ताकद दाखवण्याचा आहे. चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि तुमचा आवाज सगळ्यांपर्यंत पोहोचा. तुमचा प्रत्येक क्लिक म्हणजे मनोज जरांगे फॅक्टरला साथ आणि महाराष्ट्राच्या राजकारणात तुमचा सहभाग. मनोज जरंगे यांनी पाच दिवस सलग उपोषण करत मुंबईच चाक थांबवलं लाखोंच्या संख्येने मराठा समाज एकवटून मुंबईत आंदोलन उभं केलं आणि महाराष्ट्राच राजकारण अक्षरशः हादरलं आंदोलनाचा परिणाम असा झाला की मनोज जरांगे यांनी जी प्रमुख मागणी केली होती हैदराबाद गॅजेटरच्या मान्य करण्याची ती मान्य करून
त्याचा जीआर काढण्यात आला आणि त्यानंतरच ते आंदोलन थांबून परतले याचा थेट अर्थ असा आहे की आता मराठवाड्यातील सरसकट मराठा समाज कुणबी म्हणून नोंदवला जाणार कारण हैदराबाद गॅजेटमध्ये तशी स्पष्ट नोंद आहे. मात्र याच निर्णयाला आवाहन देण्यासाठी अगोदरच छगन भुजबळ, विजय विडेंटीवार आणि लक्ष्मण हाके यांनी रस्त्यावर उतरून लढण्याचा इशारा दिला आहे. आता मात्र सगळ्या नजरा पंकजा मुंडे यांच्याकडे लागल्या होत्या कारण पंकजा मुंडे आतापर्यंत सावधपणे संतुलित भूमिका घेत होत्या. यामागे एक महत्त्वाचं कारण म्हणजे गोपीनाथ मुंडे यांनी त्यांच्या आयुष्यभर
मराठा समाजाला आरक्षण मिळाव याला कधीही विरोध केला नव्हता. त्यामुळे पंकजा मुंडे यांना थेट विरोध करणे शक्य नव्हते तोपर्यंत पंकजा मुंडे या राजकीय दृष्ट्या शाबुत होत्या मात्र 2024 मध्ये जेव्हा त्यांनी आपला दसरा मेळावा घेतला होता तेव्हा मराठा आरक्षणाच्या संदर्भात विरोधी सूर लावला होता. त्यावेळी पंकजा मुंडे यांनी स्पष्ट शब्दात म्हटलं होतं की कोणीही दडपलेल्या गरीब किंवा मागास वर्गाविरुद्ध कट रचत असेल तर त्यांचा योग्य उत्तर देऊ हे विधान मराठा समाजाने आरक्षणाविरोधी म्हणून घेतलं त्यानंतर मनोज जरांगे फॅक्टर लोकसभेच्या निवडणुकीत
सक्रिय झाला आणि त्याचा थेट फटका पंकजा मुंडे यांना बसला शेवटी त्या निवडणुकीत पराभूत झाल्या आता पुन्हा एकदा पंकजा मुंडेंनी तेच सूर लावले एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी थेट प्रश्न विचारला की गुलामगिरीतील आरक्षण किंवा हैदराबाद गॅजेटर मान्य कसं करू शकता त्यामुळे पुन्हा एकदा राजकारणात खळबळ उडाली आहे आणि पंकजा मुंडेच विधान थेट मराठा समाजाच्या विरोधात जात असल्याच चित्र रंगत आहे. त्याला प्रति उत्तर देताना मनोज जरांगे यांनी थेट पंकजा मुंडे यांना प्रश्न केला. त्यांनी म्हटलं की जसं मंडल आयोगाने तुमच्या जातींचा आढावा
घेण्यासाठी गुलामगिरीतील नोंदीचीच दाखल घेतली आणि त्या आधारावरच तुमच आरक्षण दिलं गेलं तेच तुम्ही आज उपभोगत आहात. अगदी त्याच पद्धतीने हैदराबाद गॅजेटर लागू करण्या संदर्भातही शासनाने जुना निर्णय घेतला आणि त्याचनुसार जीआर काढण्यात आला आहे. मनोज जरांगे यांनी पुढे स्पष्ट केले की गुलामगिरीतील किंवा स्वातंत्र्यातील दस्तावेज मान्य केले जाणार नाहीत असा कुठलाही न्यायालयीन आदेश किंवा कायद्यात तरतूद नाही उलट असे सर्व दस्तऐवज सरकारी म्हणूनच मानले जातात. याच मुद्द्यावरून पंकजा मुंडे विरुद्ध मनोज जरांगे हा थेट वॉर सुरू झाला. मित्रांनो बीड पासून
मुंबईपर्यंत या संघर्षाची चर्चा रंगू लागली आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात या नव्या भिडंतीने मोठं वादळ उठवल आहे. 1918 च्या निजामशाही काळातला एक महत्त्वाचा अधिकृत दस्तायवज म्हणजे हैदराबाद गॅजेटर या गॅजेटर मध्ये मराठा समाजाची नोंद कुणबी म्हणून करण्यात आली आहे. त्यामुळे मराठवाड्यातील मराठा समाज हा गॅजेटचा आधार घेऊन कुणबी प्रमाणपत्र मिळवण्याचे प्रयत्न करत आहेत. या प्रमाणपत्राच्या आधारे त्यांना थेट ओबीसी कोट्यातील 27% आरक्षणाचा लाभ मिळू शकतो. म्हणूनच मनोज जरांगे जे मराठा आरक्षणासाठी प्रमुख कार्यकर्ते आहेत हे गॅजेट फार महत्त्वाचं
मानतात आणि सरकारकडून त्याची अंमलबजावणी करण्यात मागणी करतात. या दस्तऐवाजाला ऐतिहासिक पुरावा मानलं जातं कारण जर मराठा समाजाला कुणबी म्हणून ओळख मिळाली तर आपोआपच तो ओबीसी मध्ये समाविष्ट होतो आणि कुणबी हा ओबीसी वर्ग मानला जातो. मात्र यालाच विरोध करत पंकजा मुंडे यांनी थेट प्रश्न उपस्थित केला गुलामगिरीतील गॅजेट मान्य कस करू शकता यामुळे हा प्रश्न केवळ कायदेशीर आणि दस्ताऐवज स्वरूपाचा न राहता तो थेट राजकीय संघर्षाचा विषय ठरला आहे. पंकजा मुंडे यांनी नुकताच या हैदराबाद गॅजेटवर थेट प्रश्न उपस्थित केला. त्याचा
युक्तिवाद असा आहे की निजामशाही हा काळ हिंदू समाजासाठी विशेषतः मराठा आणि ओबीसी समाजासाठी फारच दडपशाहीचा होता. मग त्या काळातील कागदपत्र आता आरक्षणासाठी वैध कशी ठरू शकतात हा त्यांचा प्रश्न आहे. पंकजा मुंडे यांना असंही वाटतं की जर हे गॅजेट स्वीकारलं गेलं तर थेट ओबीसी कोटा कमी होईल कारण मराठा समाजाचा समावेश ओबीसी मध्ये होईल अशा परिस्थितीत मूळ ओबीसी समाजावर अन्याय होईल हे त्यांचं थोडक्यात म्हणणं आहे. पण मित्रांनो इथे मोठा प्रश्न असा निर्माण होतो की गुलामगिरीच्या काळातील कितीही गोष्टी आजही आपण वापरतो आहोत. उदाहरण द्यायचं झालं तर आज देशभर
पसरलेली रेल्वेच प्रचंड जाळ हे सगळं इंग्रजांच्या काळातल उभं राहिलेल आहे आजही आपण इंग्रजांनी बांधलेले रेल्वे पूल वापरत आहोत देशातले अनेक मोठे धरणे आजही जुन्या काळातील म्हणजेच इंग्रजांच्या काळातील उभे केलेलेच आहेत इतकच काय आपण वापरत असलेली इंग्रजी भाषा सुद्धा इंग्रजांच्या काळातील वारसा आहे म्हणजेच गुलामगिरीच्या काळातील गोष्ट आजही आपण मान्य केले आहेत वापरत आहोत आणि त्यांचाच फायदा घेतो आहोत मग अशा परिस्थितीत हैदराबाद गॅजेट सारख्या दस्ताऐवाजांना फक्त गुलामगिरीच्या नावाखाली नाकारायचं का असा थेट प्रती प्रश्न उभा राहतो आणि याच पार्श्वभूमीवर
आता मनोज जरांगे यांनी मंडळ आयोगावरच सवाल उपस्थित केलेला आहे मनोज जरांगे यांनी थेट विधान केलं की मंडळ आयोगाने जे दिलं ते तुम्हीच खाल्लं थोडक्यात सांगायचं तर मंडळ आयोगाने 1980 मध्ये आरक्षणाची शिफारस केली. ही शिफारस सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेपणाच्या आधारावर होती. त्यासाठी मोठा सर्वेक्षण आणि ऐतिहासिक डेटा वापरण्यात आला. त्या आधारावरच अनेक समाजांना ओबीसी वर्गात समाविष्ट करण्यात आलं आता ह्याच मुद्द्यावर समानता दाखवत मनोज जरांगे म्हणतात की जसं मंडळ आयोगाने ऐतिहासिक आणि सामाजिक पुरावे वापरून ओबीसी वर्गीकरण केल तसच आज हैदराबाद गॅजेटरच्या
आधारे मराठा समाजाला कुणबी म्हणजेच ओबीसी म्हणून ओळखलं जाऊ शकतं त्यांचा साधा मुद्दा असा आहे जसं तुम्हाला मंडळ आयोगातून मिळालं आणि ते तुम्ही स्वीकारलं तसं आम्हीही मराठ्यांना मागतो आहोत दुसरं काय आणि याच पार्श्वभूमीवर सध्या पंकजा मुंडे विरुद्ध मनोज जरांगे अश अशी परिस्थिती तयारी झालेली आहे. आता होऊ घातलेले दोन दसरा मेळावे आहेत. एक नारायणगडावर आणि दुसरा सावरघाट येथे या दोन्ही मेळाव्यात दोघेही म्हणजेच मनोज जरांगे आणि पंकजा मुंडे मोठ्या संख्येने जनसमुदाय एकत्रित करणार आहेत. या मेळाव्यांमध्ये कोणाच्या दसरा मेळाव्याला
किती गर्दी आहे हे पाहिलं जाणार आहे त्याचबरोबर कोण काय स्टेटमेंट करतं यावरही सगळ्यांची नजर आहे. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो लोकसभेत पंकजा मुंडेंना विरोधी भूमिका घेतल्यामुळे त्यांचा पराभव झाला का? तिथे बजरंग बाप्पा सोनवणे पावले का आणि जरांगे फॅक्टरने तिथे प्रभाव टाकला का आताही पंकजा मुंडे यांनी स्टेटमेंट करून पुन्हा बीडच राजकारण संकुचित केलं का हा तात्पुरता प्रश्न वाद निर्माण करतो आहे. कमेंट सेक्शन मध्ये तुमच्या मते जरूर व्यक्त व्हा अशी माहितीपूर्ण व्हिडिओ साठी आपल चॅनल नक्की सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र
Leave a Reply