भिजवायची वेळ आली आणि हे पेटवून गेले | मुंडे vs जरांगे | मेळावा वरचढ कोण ठरलं Jarange vs Pankaja M

नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र दोन जीआर काढून मनोज जरांगे यांना हैदराबाद गॅजेटनुसार मराठवाड्यातील मराठा समाजासाठी आरक्षण मिळालं होतं पण मनोज जरांगे यांनी पुन्हा डिवचलं आणि जिथे भिजवायची वेळ आली होती तिथेच ते पेटवून गेले. इकडे पंकजा मुंडेंनी ही भव्य शक्ती प्रदर्शन केलं. दसरा मेळाव्याच्या मैदानावर मनोज जरांगे आणि पंकजा मुंडे दोघेही एकमेकांसमोर वरच ठरले. पंकजा मुंडेच्या स्टेजवर महादेव जानकर, लक्ष्मण हाके, धनंजय मुंडे, प्रीतम मुंडे, नमिता मुंदडा यांसह अनेक ओबीसी नेत्यांची फौज जमली होती. एका हाकेवर किती

लोकांना आकर्षित करता येतं हे पंकजांनी दाखवून दिलं मात्र या सगळ्या ताकतीच्या प्रदर्शनात वाल्मिक कराड यांची पोस्टर झळकली आणि तिथेच पंकजा मुंडेंची तळपायाची आग मस्तकाला गेली. जेवढं उभारलं होतं त्यावर पाणी फिरतं की काय अशीच परिस्थिती निर्माण झाली. भर सभेतच पंकजा मुंडेंनी हळहळ व्यक्त केली. भगवान गड माझ्याकडून हिसकावून घेतलाच केला. आता हा दसरा मेळावाही हिसकावून घेणार का? असं म्हणत त्या मुद्द्यावर सारवासारव करण्याचा प्रयत्न झाला. पण त्याच क्षणी धनंजय मुंडे उठले डोळे वटार आणि अक्षरशः रौद्र रूप धारण केलं तरीसुद्धा वाल्मिक कराडचे

समर्थक ऐकण्याच्या मूडमध्ये नव्हते किंवा असं म्हणावं लागेल की ते मुद्दामच ठरवूनच आले होते. जर तुम्ही मनोज जरांग यांचे कट्टर समर्थक असाल मित्रांनो तर हा क्षण तुमची ताकद दाखवण्याचा आहे. चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि तुमचा आवाज सगळ्यांपर्यंत पोहोचवा. तुमचा प्रत्येक क्लिक म्हणजे मनोज जरांगे फॅक्टरला साथ आणि महाराष्ट्राच्या राजकारणात तुमचा सहभाग. मित्रांनो कालचे दोन्ही दसरा मेळावे म्हणजे थेट जातीच्या मुद्द्यावर रंगलेला खेळच होता. मनोज जरांगे यांनी स्पष्ट संदेश दिला जातीसाठी लढा प्रशासक बना कलेक्टर बना कारण कोणताही

दादा समोर आला तरी शेवटी त्याला प्रशासकासमोर कलेक्टर समोर झुकावच लागतं आणि हात जोडावेच लागतात त्यांनी पुढे चेतावणी दिली जो आपल्या विरोधात जाईल त्याच्याशी लढा पण ओबीसी विरोधात नको आरक्षणा विरोधात जो जातोय त्याच्याशी लढा आणि विशेषतः पंकजा मुंडे विरोधात लढा असं अप्रत्यक्षपणे जरंगेनी ठणकावलं आणि पुन्हा एकदा जाती जातीवर शिक्का मोर्तप केलं तसं पाहिलं तर हा दसरा मेळावा पंकजा मुंडेंचा एकटीचाच असता पण काल वेगळा होता कारण डीएम म्हणजे धनंजय मुंडे यांना आयत स्टेज मिळालं हजारोंच्या लोकसमुदाय मिळाला आणि त्याचा फायदा घेत त्यांनी मनात येईल तेवढं

मनसोक्त बोलून दाखवलं माझ्या विरोधात मीडिया ट्रायल केली गेली माझ्यावर आरोप झाले पण ते आरोप कोर्टात टिकले नाहीत या काळात जेव्हा मी एकटा होतो तेव्हा पंकजा मुंडे मला तासंतास धीर देत होते. माझी बहीण माझ्यासोबत उभी होती असं सांगून धनंजय मुंडेंनी भर सभेत पंकजा मुंडेंना आपल्या बाजूस असल्याचं अप्रत्यक्षपणे कबूल केलं पण इथेच खरी गंमत आहे कारण या वक्तव्यामुळे एक नवीन राजकीय समीकरण आणि तितकच मोठं आवाहन निर्माण झाल आहे कारण बीडचा इतिहास पाहिला तर एक गोष्ट स्पष्ट दिसते इथे फक्त आणि फक्त मुंडे फॅक्टर चालतो. पूर्वी गोपीनाथ मुंडे वन साईड

चालायचे. त्यांच्या पश्चात पंकजा मुंडे आघाडीवर आल्या. मात्र त्याचवेळी धनंजय मुंडेंनी विरोधी भूमिका घेतली आणि तिथूनच सुरू झाला तो थरारक वॉर. पंकजा मुंडे विरुद्ध धनंजय मुंडे त्यानंतरच्या चित्रात पंकजा मुंडेंना मोठं राजकीय आवाहन झेलावं लागलं. 2019 ला हाच धनंजय मुंडे पंकजा मुंडेंना पराभूत करून गेला. पुढे परिस्थिती बदलली दोघेही एकत्र आले पण या एकत्रीपणाची किंमत एका बहिणीच्या राजकीय बळीच्या स्वरूपात मोजली जात आहे हे अनेक जण विसरत आहेत लोकसभेत विद्यमान खासदार असताना प्रीतम मुंडेच तिकीट कापलं गेलं आणि विधानसभेत पंकजा मुंडेंना मैदानात

उतरण्याची संधी जवळपास नाकारली गेली. त्यामुळे पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे या दोघींपैकी एकीचा राजकीय बळी धनंजय मुंडेंना जवळ केल्यामुळे दिला जातोय असं समीकरण समोर येतं. यातून मोठा प्रश्न निर्माण होतो पंकजा मुंडेंनी आधीसारखं दोन हात लांब राहणं योग्य होतं का कारण पंकजा मुंडेंच राजकारण वेगळं आहे त्या सुशिक्षित आणि सुसंस्कृत पद्धतीने राजकारण करतात आणि कदाचित त्यामुळेच त्या इतरांपेक्षा वेगळ्या भासतात तर वाल्मिक कराड प्रकरणापासून धनंजय मुंडेवर दादागिरी दहशत आणि गुन्हेगारी प्रवृत्तीच राजकारण करतात असा ठपका ठेवला जातो त्यामुळे आता प्रश्न

असा निर्माण होतो की धनंजय मुंडेंना साईड कॉर्नर करण्याच्या प्रयत्नात पंकज मुंडेच साईड कॉर्नर होतील का? भाऊबहिणींच्या या नात्यात जुने किस्से उकरून पाहिले तर एक महत्त्वाचा प्रसंग आठवतो मित्रांनो. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते असताना धनंजय मुंडेंनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पंकजा मुंडेच्या महिला आणि बालकल्याण खात्याशी संबंधित चिक्की खरेदी घोटाळा तब्बल 206 कोटींच्या कथित गैरव्यवहाराची तक्रार केली होती. म्हणजेच एकेकाळी थेट बहिणी विरोधात आरोप करणारे धनंजय आज राजकीय समीकरणात त्यांच्या सोबत

दिसतात. मग हा भाऊबहिणीचा समन्वय खरा आहे का फक्त राजकारणाचा खेळ आहे. त्यावेळी पंकजा मुंडेंनीही थेट प्रति उत्तर दिलं होतं जे माझ्या वडिलांना जिवंत असताना हरवू शकले नाहीत आणि राजकारणात अपयशी ठरले ते आता माझ्यासोबत बदला घेत आहेत. मी काहीही चुकीचं केलेलं नाही तरीही मला मानसिक त्रास दिला जातोय. मी कोणत्याही चौकशीसाठी तयार आहे असं स्पष्ट शब्दांत त्यांनी सांगितलं होतं तर मित्रांनो हा झाला एक किस्सा पण दुसरा किस्सा अजून गंभीर होता. गोपीनाथ मुंडे यांनी स्थापन केलेल्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या नोंदीमध्ये छेडछाड

केल्याच्या आरोपावरून 2015 मध्ये धनंजय मुंडेचे वडील पंडितराव मुंडे यांच्या विरोधात एफआयआर दाखल झाली होती. ही वेळ होती जेव्हा पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यातील राजकीय वाद टोकाला गेला होता. कारखान्याच्या निवडणुकी दरम्यानच ही तक्रार नोंदवण्यात आली होती म्हणजेच भाऊबहिणींचा संघर्ष हा फक्त व्यक्तिगत नव्हे तर कौटुंबिक वार्षाच्या संस्थावर देखील थेट परिणाम करणारा होता. पंकजाच्या बाजूने असलेल्या आमदारांनी त्या काळात ठाम आरोप केला होता की एफआयआर योग्यच आहे कारण पंडितराव मुंडे यांनी खरोखरच रेकॉर्डमध्ये

छेडछाड केली होती. तर दुसरीकडे धनंजय मुंडेंनी आपल्या वडिलांचे समर्थन करताना म्हटलं होतं. कारखान्याच्या यशासाठी माझे वडील पंडितराव मुंडे यांनी प्रचंड मेहनत घेतली आहे पण यांच्यावर रेकॉर्ड मध्ये छेडछाडीचा खोटा आरोप करण्यात आला आहे. हा झाला दुसरा किस्सा आता येतो तिसरा किस्सा 17 ऑक्टोबर 2019 रोजी बीड जिल्ह्यातील केस तालुक्यातल्या विधा गावात झालेल्या सार्वजनिक सभेत धनंजय मुंडेवर थेट आरोप झाला की त्यांनी पंकजा मुंडेच्या विरोधात अश्लील आणि अक्षेपार टिप्पण्या केल्या होत्या. या प्रकरणात 19 ऑक्टोबर 2019 रोजी

परळी भाजप अध्यक्ष जुगल किशोर लोहिया यांनी तक्रारीवरून धनंजय मुंडे यांच्या विरोधात भारतीय दंड संहिता कलम 500 आणि कलम 509 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. धनंजय मुंडे यांनी या व्हिडिओला बनावट असल्याचा दावा केला. त्यांचं म्हणणं होतं की त्यांच्या बोलण्याचा विपर्यास केला गेला. या व्हिडिओची फॉरेन्सिक तपासणी करा आणि मगच माझ्यावरती आरोप करा असं धनंजय मुंडेंनी म्हटलं होतं याहीपेक्षा असे अनेक किस्से आहेत की धनंजय मुंडे विरोधात पंकजा मुंडे हा वाट टोकाला गेला होता. ज्यावेळी करुणा शर्मा यांनी धनंजय मुंडे वरती आरोप केले होते त्याही वेळा

पंकजा मुंडे गप्प होत्या. ज्यावेळी चिक्की घोटाळ्यात आरोप झाले त्याही वेळेस त्या काही प्रमाणावरती गप्प राहिल्या. आणि आता धनंजय मुंडे यांच्यावरती संतोष देशमुख हत्या प्रकरणात झालेल्या आरोपावरूनही पंकजा मुंडे या शांतच राहिल्या. पंकजा मुंडे यांनी शांत राहणं आणि धनंजय मुंडेनी हावी होणं या सगळ्या गोष्टी सांगतायत की भविष्यात पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे दोघी बहिणींपैकी कोणत्याही एकाच बहिणीला राजकीय स्कोप राहणार आहे. कारण बाकीचा स्कोप धनंजय मुंडे यांनी कधीच व्यापला आणि पलीकडे जाऊन जर विचार करायचा ठरला तर काल

पंकजा मुंडे यांनी त्यांच्या दसऱ्या मेळाव्यातून ओबीसी साठी लढण्याची आणि मनोज जरांगेनी त्यांच्या दसरा मेळाव्यातून मराठ्यांसाठी लढण्याची घोषणा केली. आता पाहूया या दोन्ही जाती एकमेकांच्या विरोधात असल्या आल्यामुळे भविष्यातील बीड आणि मराठवाड्याचे राजकारण हे सगळ्या जातीवरच जाणार का? असा प्रश्न तयार होतो. प्रामाणिकपणे एक प्रश्न तुमच्यासाठी सोडतो मित्रांनो. पंकजा मुंडे असो किंवा मग मनोज जरांगे असो दोघांनीही काल त्यांच्यात त्यांच्या दसऱ्या मेळाव्यामध्ये केलेली वक्तव्य ही योग्य होती का याबाबत कमेंट सेक्शन मध्ये जरूर व्यक्त व्हा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *